लातूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.. बेळसांगवीमध्ये शेती वाहून गेल्याने महिलेला अश्रू अनावर झालेत.. लातूरच्या बेळसांगवीतील केरणबाई सोमवंशी या मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत आहेत.. त्यांना एकच एकर शेती होती मात्र तीरू नदीच्या पुराने गेली वाहून गेल्याने त्या हतबल झाल्या आहेत.