हिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वारी येथे पावसाचा कहर सुरूच आहे. वारी येथिल मधुकर टेके यांच्या वस्तीला कोळ नदी व चोंढी नाल्याच्या पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात टेके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्य अडकून पडले आहेत. याभागात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं टेके यांच्या वस्ती पर्यंत पोहचण शक्य होत नाही.. काल रात्री पासून हे कुटुंब याठिकाणी अडकून पडले असून दुरध्वनी वरुन त्यांचा सोबत संपर्क करण्यात आलाय..