Solapur LPG Gas Pump Close| सोलापुरातील LPG गॅस पंपाला कुलूप, गॅस नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार?

सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला कुलूप लागलंय. पुढील वीस दिवस कोणत्याही ऑटो एलपीजी गॅस पंपाला गॅस मिळणार नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार होत असल्याचा आरोप आहे. सोलापुरात आरटीओ नोंदणीकृत 18 हजार ऑटो एलपीजी रिक्षा चालकांना रोज 22 टन गॅसचा पुरवठा केला जातो. पेट्रोलच्या तुलनेत गॅस स्वस्त मिळतो आणि त्याला मायलेज देखील जास्त मिळत असल्याने रिक्षाचालकांचा ओढा ऑटो एलपीजीकडे आहे. मात्र आता सोलापूर शहरातील सर्वच ऑटो एलपीजी पंप बंद झाल्याने रिक्षाचालक अडचणीत आले आहेत... सोलापुरात 18 ते 20 हजार रिक्षा चालक आहेत.. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ