Mahadev Munde Case Update| महादेव मुंडे प्रकरणाचा तपास CBI कडे, ज्ञानेश्वरी मुंडेंवर ICUमध्ये उपचार

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक न झाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात प्राथमिक उपचारानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना 72 तासांसाठी ठेवण्यात येणार आहे. आज दुसऱ्या दिवशीही त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून तपासाला सुरुवात झाली आहे. अठरा महिन्यांपूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाला होता, मात्र या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळावा यासाठी हे टोकाचं पाऊल उचलले आहे.

संबंधित व्हिडीओ