आठवड्याभराच्या पावसामुळे संपूर्ण राज्य जलमय झालंय.. विशेष म्हणजे दुष्काळी भाग असलेल्या मराठवाडा आणि सोलापूरच्या काही भागाला यंदा पावसाने चांगलंच झोडपलंय. नेहमीच आटलेल्या नद्यांचा यंदा रुद्रावतार पाहायला मिळाला.. गोदावरी, पैनगंगा, कयाधू, मांजरा, सीना या नद्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय.. नद्यांनी हाताशी आलेली पीकं तर वाहून नेलीच..पण जमीनही खरडून नेलीय. त्यामुळे पाऊस ओसरल्यानंतर करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.. पाहुयात हा रिपोर्ट...