Maharastra| सरकारी कागदपत्रं घरबसल्या Whatsappवर मिळणार, 'आपलं सरकार' पोर्टलमधील 1001 सेवांचा लाभ

सरकारी कागदपत्रं मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयांची करावी लागणारी हेलपाटे बंद होणार आहेत. सर्व प्रकारच्या सरकारी सेवांची कागदपत्रं आता व्हॉट्सअॅपवर घरबसल्या मिळणार आहेत. 'आपले सरकार' पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू आहे. त्या पैकी 997 सेवा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये 236 सेवांची वाढ झाली आहे. या सर्व सेवा आता घर बसल्या व्हॉट्सॲप वरती मिळणार आहेत.

संबंधित व्हिडीओ