केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत होते. गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येण्याची अमित शाह यांची वार्षिक परंपरा आहे.