मीरा-भाईंदरच्या पेणकर पाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये पैसे वाटप करत असताना एका महिलेला पकडल्याची घटना घडली आहे....शिवसेनेकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे....संबंधित महिलेकडून पैशांची पाकिटे जप्त करण्यात आली असून, हे वाटप एका सोनाराच्या दुकानातून सुरू असल्याचे सांगितले जात आहे....जप्त केलेल्या प्रत्येक पाकिटात दोनशे रुपयांच्या 50 नोटा असून, एकूण दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.....कारवाईदरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.