अकलूजमधील सभेत जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. 'अकलूजच्या राजकारणाची वाट लावली' असा टोला लगावत त्यांनी थेट दहशत मोडून काढण्याचा इशारा दिला. फक्त एका चिठ्ठीवर केस न करता 'कार्यक्रम लावतो' असे जाहीर आव्हानच गोरेंनी भरसभेत दिल्याने स्थानिक राजकारण तापले आहे.