मागील काही दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. सांताक्रूझ केंद्रात तब्बल ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्ण वारे आणि वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. पुढील एक-दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.