चिपळूण येथील सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६८) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने पैशांच्या हव्यासापोटी खून केल्याचे उघड झाले आहे.