राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार का याच्या चर्चा सुरू झाल्यायत. कारण माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोन वर्षांच्य तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या आमदार, खासदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यास त्याची आमदारकी आणि खासदारकी धोक्यात येते आणि तो अपात्र ठरतो.