नेपाळमधील भीषण दुर्घटनेनंतर मृतांचा आकडा वाढत असताना प्रशासनासमोर आता ओळख न पटलेल्या मृतदेहांचं व्यवस्थापन करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. चितवन जिल्ह्यातील देवघाट जंगल परिसरात सुमारे २०० अनोळखी मृतदेह तात्पुरते दफन करण्यासाठी सामूहिक कबरी खोदल्या जात आहेत. मृतदेहांचे फोटो आणि डीएनए नमुने जतन केल्यानंतर नातेवाईकांची ओळख पटल्यास संबंधित मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द केले जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर यांनी