आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शंभर नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. पक्षातील शिस्त आणि एकजुटीवर भर देत, अंतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही असा स्पष्ट संदेश खासदार नरेश मस्के यांनी दिला.