संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर परळी शहर या सर्व घडामोडींचं केंद्रबिंदू बनलेलं आहे. काल परळी शहर बंदची हाक देण्यात आली होती आणि आज पुन्हा परळी शहर बंद आहे. एवढंच काय तर परळी शहरातील व्यापारी संघटनांकडून सुद्धा लाउड स्पीकर द्वारे बंदची हाक दिली जाते आहे.