काँग्रेस सरकारच्या दशकभराच्या काळामध्ये व्यापारी तूट सरासरी वार्षिक पंचेचाळीस टक्क्यांनी वाढली. या कालावधीमध्ये चीन मधून हलक्या दर्जाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेमध्ये आल्या. त्यातून भारतीय ग्राहकांना स्वस्तात खराब माल घेण्याची सवय लागली असा गंभीर आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस वर केलेलं आहे.