वसई विरार महानगरपालिकेच्या मतदानानंतर मतमोजणीची तयारी देखील वसई विरार शहर महापालिका प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.विरार पश्चिमेला महापालिका मुख्यालयात ही मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.या ठिकाणी नऊ कक्ष तयार करण्यात आले असून, गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्येक आरोला कक्षनिहाय कलर कोड देण्यात आला आहे.शिवाय स्ट्रॉंग रूमचे चित्रण सीसीटीव्हीच्या माध्यमातून उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीला पाहता येणार आहे. या मतमोजणीच्या तयारी बाबत महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.