पुण्यातल्या राजगुरूनगर मधून दोन मुलींच्या हत्येप्रकरणी आता राजगुरूनगर बंदची हाक देण्यात आली आहे. राजगुरूनगर शहरातील दोन चिमुकल्यांवरती अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ राजगुरूनगर शहर बंद ठेवण्यात आलंय. मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह पिंपात टाकण्यात आलेला होता आणि या हत्येच्याच निषेधार्थ राजगुरूनगर शहर पूर्णपणे बंद आहे सगळे व्यवहार आज ठप्प आहेत.