भाजपच्या धोरणावर टीका करणाऱ्या पुण्यातल्या पूजा मोरे यांना दिलेल्या उमेदवारीवरून पुणे भाजपामध्ये जोरदार नाराजी उफाळून आली. अखेर पक्षांतर्गत नाराजीची दखल घेत, पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उमेदवारी अर्ज मागे घेताना पूजा मोरे या ओक्साबोक्शी रडल्या. पूजा मोरे यांना धानोरी प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली होती. पण पूजा मोरे या भाजापच्या टीकाकार असल्याचा दावा करत भाजपाच्या स्थानिकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. पहलगाम हल्ल्यानंतर पूजा मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा दावा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलाय.