मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांचा महापौर बसणार असं वक्तव्य काल कृपाशंकर सिंह यांनी केलं होतं... त्यावर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय.भाजपला मराठी माणसाला महापौर करायचं नाही, कृपाशंकर सिंह भाजपचा बोलका पोपट आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय.. त्यावर आता भाजप प्रवक्ते आणि उमेदवार नवनाथ बन यांनीही पलटवार केलाय... संजय राऊत स्वत: पोपटलाल आहेत, असा टोला बन यांनी लगावलाय.