डिलिमिटेशनच्या मुद्द्वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मत असल्याची चर्चा सुरू असताच रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केलंय.राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नितीमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो.. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर ‘त्यागा’च्या रामायणाऐवजी ‘स्वार्था’च्या पायावर उभं असलेलं ‘महाभारत’च घडताना दिसतं. अशी पोस्ट त्यांनी केलीय. रामायण चित्रपत्र बघून आल्यावर रोहित पवारांनी पोस्ट केल्याचं सांगितलंय मात्र त्यांचा रोख पक्षातील नेत्यांकडेच असल्याची चर्चा आहे.