पालघरच्या वाढवण समुद्रकिनारी दोन डॉल्फिन आढळून आल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भरतीच्या पाण्यासोबत हे दोन्ही डॉल्फिन किनाऱ्याच्या दिशेने आल्याची माहिती आहे. डॉल्फिन किनाऱ्यावर आल्याचं समजताच स्थानिक नागरिक, वनविभाग आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने तातडीने बचावकार्य सुरू केलं. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन्ही डॉल्फिनना सुखरूप पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात यश आलं. त्यामुळे दोन्ही डॉल्फिनना जीवदान मिळालं असून, वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेचं कौतुक होत आहे.