सध्या महाविकास आघाडीमध्ये स्वबळाचेही वारे वाहू लागले आहेत. महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही हे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसच आम्ही स्वतंत्रपणे लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे असंही राऊतांचं म्हणणं आहे तर स्वबळावर लढायला राऊतांना थांबवलय कुणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढणार असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. महानगरपालिके मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे