नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील धुवाधार पाऊस होत असून यामुळे जिल्ह्याचा धरण साठा 43 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दारणा, गंगापूर यासोबतच कादवा धरणातून तीन दिवसांपासून विसर्ग सुरू असून यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते आहे. गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 क्युसेक एवढा करण्यात आल्याने रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे.