Satara | ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’चा गजर, बावधनमधील बगाड यात्रा उत्साहात पार

साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’ चा गजर करत भाविकांनी बगाडाचे दर्शन घेत भक्तिभावाने नवस फेडले. यंदा विठ्ठल सोपान कदम यांना बगाड्याचा मान मिळाला....भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, मिरवणूक आणि पारंपरिक बगाड हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे...देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.होळी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर मंदिरातील पुजारी पारंपरिक पद्धतीने देवाला कौल लावून बगाड ठरवतात. यावर्षी नवस फेडण्यासाठी एकूण ६१ नवसकरी बसले होते. त्यापैकी ३७व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाचा कौल लागल्याने त्यांना बगाड होण्याचा मान मिळाला.

संबंधित व्हिडीओ