सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात इशाऱ्यांचा खेळ रंगलाय...... अजित पवार आणि शिंदे सारखे दिल्लीत का जातात, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.... त्यावर फडणवीस म्हणाले.... ते दिल्लीत जाऊन माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटतात, तोपर्यत काही हरकत नाही..... फडणवीसांच्या या इशाऱ्यांमध्ये नेमकं काय दडलंय..... याची आता चर्चा आहे... फडणवीसांच्या या इशाऱ्याला अजित पवारांनीही उत्तर दिलंय... त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत बसलेल्यांमध्ये काही बदल दिसणार का, असाही प्रश्न आहे...