महाराष्ट्राच्या राजकारणात गेली २५ वर्षं एक बंद बाटली आहे... आणि त्या बाटलीत एका भूताला बंद करुन ठेवलंय... पण या निवडणुकीत अजित पवार ओढून ओढून या भूताला बाहेर काढतायत... ते भूत म्हणजे सिंचन घोटाळ्याचं भूत... अजित पवारांनी ही निवडणूक सुरू केली ती सिंचन घोटाळ्यावरुन चौकार मारत.... आणि निवडणूक संपवली तीसुद्धा या सिंचनावरच..... सिंचन घोटाळा हा आतापर्यंत अजित पवारांची विकेट घेणारा वाटत होता... मात्र आता अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे चेंडू कुणाकुणाकडे टोलावलेत..... आणि राज्यातसा सामना कसा रंगतदार झालाय.... पाहुया...