राज्यात 29 महापालिकांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मात्र या 29 पैकी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेकडे... कारण मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलीय. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीही मुंबईत चांगलाच जोर लावलाय. प्रचार संपला आणि मतदान काही तासांवर आल्यानंतर ठाकरे बंधू आज मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक झाले आणि देवीला साकडंही घातलंय... पाहूया