वॉशिंग मशीन हा शब्द विरोधक आवर्जून वापरतात.... भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये टाकलं की आरोप असलेला नेता स्वच्छ होतो, असा आरोप विरोधक सातत्यानं करतात.... मात्र आता याच वॉशिंग मशीनमधून सत्ताही स्थापन करता येईल, असं काही राजकीय पक्षांना वाटतंय... त्यामुळेच मध्यरात्री पुण्यात सुरू झाला तो वॉशिंग मशीन वाटण्याचा खेळ..... मशीन्स फक्त वाटलीच नाहीत.... तर ती घरोघरी पोहोचून त्यात कपडे धुतलेसुद्धा..... तर दुसरीकडे पुण्यातल्याच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी चक्क चांदी वाटण्यात आल्याचाही आरोप आहे... काय आहे ही वॉशिंग मशीन आणि चांदीची पुण्यातली भानगड.... पाहुया...