ढिसाळ कारभारामुळे एसटी तोट्यात गेली असली तरी त्याचं खापर सरकारनं महिलांवर फोडलेलं आहे. महिलांना तिकीट भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात गेलेली आहे असं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली त्यामुळे एसटी ला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतो असं सरनाईक यांनी म्हटलंय.