कविवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला आणि महाराष्ट्राला गझलेची बाराखडी दिली.अनेक गझलकारांना सुरेश भटांनी लिहीतं केलं.भटांच्या रचनांनी संपूर्ण देशाला जणू काही मोहिनीच घातली होती,असं त्यांचं काव्य. त्याच सुरेश भटांचा आज स्मृतीदिवस. त्यांचा जन्म हा अमरावतीतल्या राजापेठ भागातील भटवाडी इथला.इथे पन्नास वर्षापर्यंत वास्तव्य करणारे सुरेश भट नेमके कसे होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न NDTV मराठीने केलाय.डॉ.नरेशचंद्र काठोळे, कवी विष्णू सोळंके, रवी दांडगे, संदीप गोडबोले यांना सुरेश भट यांचा सहवास लाभला..याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी...