अंजली दमानेयां पाठोपाठ भाजप नेते सुरेश धस यांनीही कृषी घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. कृषी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सिट स्थापन करावी अशी मागणी करतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी धसांनी केली.