तामिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम असल्याचं समोर आलंय.विजय थलपतीकडून 121 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करण्यात येत होता... मात्र व्हीसीके आणि IUML पक्षाकडून अद्याप पाठिंब्याचं पत्रच टीव्हीकेला देण्यात आलं नाही. त्यामुळे आताच्या घडीला विजयकडे 116 आमदारांचाच पाठिंबा आहे.. राजभवनातील सुत्रांनी ही माहिती दिलीय.. एकीकडे उद्या शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय. मात्र अजूनही विजयच्या टीव्हीके पक्षाकडून आकड्यांची जुळजुळवा होताना दिसत नाहीय... त्यामुळे या घडमोडींकडे आता लक्ष लागलंय.