तामिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम असल्याचं समोर आलंय.. विजयकडे 116 आमदारांचं संख्याबळ-असल्याची माहिती समोर आली.. सत्ता स्थापन करण्यासाठी 118 आमदारांचं संख्याबळ गरजेचं आहे... मात्र अद्याप आवश्यक असलेल्या व्हीसीके आणि IUML पक्षाकडून अद्याप पाठिंब्याचं पत्रच टीव्हीकेला देण्यात आलेलं नाही.. त्यामुळे आताच्या घडीला विजयकडे 116 आमदारांचाच पाठिंबा आहे.. राजभवनातील सुत्रांनी ही माहिती दिलीय.. दरम्यान, TVK ला पाठिंब्याचं पत्र ईमेलच्या माध्यमातून पाठवल्याचं व्हीसीके पक्षाने ट्वीट करत सांगितलंय.. पाठिंब्याबाबत उद्या सकाळी अधिकृत घोषणा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.. तर दुसरीकडे आम्ही अद्यापही DMK सोबतच असल्याची भूमिका IUML पक्षाने घेतलीय. एकीकडे उद्या शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय. मात्र अजूनही विजयच्या टीव्हीके पक्षाकडून आकड्यांची जुळजुळवा होताना दिसत नाहीय... त्यामुळे या घडमोडींकडे आता लक्ष लागलंय.