उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा उल्लेख केल्यानंतर जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी त्यांच्यासह संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झाल्याचा गंभीर आरोप केला. गेल्या 70 वर्षांत काँग्रेस सरकारने जेवढा भ्रष्टाचार केला नसेल, तेवढा भ्रष्टाचार भाजपच्या लोकांनी 10 वर्षांत केला.. असा दावा विजय पांढरेंनी केलाय.. तसेच त्यांनी अजित पवारांवरही जोरदार घणाघात केलाय...