महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आलीय.. पती आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं होतं. याचप्रकरणी वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव होता असा आरोप विवाहितेच्या आईने केलाय.. भाग्यश्री पाचांगणे यांची मुलगी दीपाली पाचांगणे हिच्या संशयास्पद मृत्यूबाबत आता थेट मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केलीय. मृत विवाहिता दीपाली पाचांगणेचा विवाह भारतीय सैन्यातील अधिकारी अजिंक्य निंबाळकर यांच्याशी झाला होता.. मात्र लग्नानंतर तिचा सासरच्यांकडून छळ होत होता.. त्यानंतर तिने गळफास घेत आयुष्य़ संपवलं होतं. मात्र आता याप्रकरणात तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचा दबाव होता असा आरोप आता करण्यात येतोय..