Dhangekar vs Mohol | जैन बोर्डिंगचा वाद! व्यवहार रद्द झाल्यावरही धंगेकरांनी मोहोळांना का दिला इशारा?

पुणे शहरातील अत्यंत मौल्यवान जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या (Jain Boarding Hostel Land) विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर बिल्डरसोबत असलेल्या जुन्या भागीदारीवरून गैरव्यवहाराचे आणि पदाचा गैरवापर करण्याचे गंभीर आरोप केले होते. यामुळे पुण्यात 'महायुतीत दंगा' नको, अशी सूचना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना दिली होती. अखेर, जैन समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करत गोखले बिल्डर्सने (Gokhale Builders) हा व्यवहार रद्द करण्याचा ई-मेल ट्रस्टला पाठवला आहे.

संबंधित व्हिडीओ