फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजलीय. डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्या दोघांची नावं लिहिली होती. त्या दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. महिला डॉक्टरची आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप करण्यात येतोय. सुषमा अंधारे आणि धनंजय मुंडेंनीही तशी शंका उपस्थित केलीय. इतकंच नाही तर पीडितेच्या कुटुंबियांनीही गंभीर आरोप केलेत... ते आरोप नेमके काय आहेत? अंधारे आणि धनंजय मुंडे यांनी काय शंका उपस्थित केलीय? पाहूया