मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या धोरणास मान्यता दिल्याची माहिती आहे. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक धोरणासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यानंतर या समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.