मराठा आरक्षणाच्या लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवली सराटीमध्ये आज पुन्हा एकदा जनसागर लोटला आहे. संपूर्ण गावात आणि परिसरात फक्त भगवे वादळ दिसत असून अभूतपूर्व गर्दी जमली आहे. राज्याच्या कोण्याकोपऱ्यातून मराठा बांधव सकाळपासूनच अंतरवली सराटीच्या दिशेने कूच करत आहेत. हजारोच्या संख्येने आंदोलक दाखल झाल्यामुळे परिसर पूर्णपणे फुलून गेला आहे. अंतरवली सराटीतील ही विक्रमी गर्दी ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून सुशांत काशीद यांनी टिपली आहे. आकाशातून घेतलेल्या या विहंगम दृश्यांमध्ये जिथे पाहावे तिथे केवळ मराठा आंदोलकांची अथांग गर्दी नजर पडत आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. या दृश्यांवरूनच आंदोलनाचा वाढता तीव्र प्रभाव आणि मराठा समाजाचा एल्गार स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.