मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले....नकाने तलाव येथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता....मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले...नकाने तलाव येथे जलसमाधी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली....आंदोलकांनी तलावात उड्या मारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
Dhule News | Support for Jarange's agitation from Dhule; protesters attempt 'Jalsamadhi' (ritual immersion in water) in Nakane Lake.