पिंपरी- चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच.काही तासांच्या अंतरात आणखी एक घटना.मोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी केली तोडफोड करण्यात आली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो, यावरुन वादाला तोंड फुटले अन पुढं या वादातून वाहनांची तोडफोड झाली.रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला.केएसबी चौकात काल दिवसा ढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.तर काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा हा प्रकार घडला.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे.