पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात निवडणुकीच्या काळात मतदारांना वॉशिंग मशीन आणि चांदीची भांडी वाटली जात असल्याची माहिती समोर आलीय....मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत......या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे...मात्र निवडणूक प्रशासनाने १९ वॉशिंग मशीन जप्त केल्यानंतर आता NDTV मराठीने अशीच एक वॉशिंग मशीन पोहोचलेलं घरं प्रत्यक्ष शोधून काढलं आहे.....याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.....