भारतीय राजकारणातील एक मोठी आणि कधीही न सुटलेली केस म्हणजे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची हत्या. त्यांचाच सख्खा भाऊ प्रवीण महाजन याने गोळी झाडून त्यांची हत्या केली, पण हत्येमागील 'असली' कारण आजही रहस्यमय आहे. आता त्यांची कन्या पूनम महाजन यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.