भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागील 'असली' कारण आजही गुलदस्त्यात आहे. प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून सुटल्यावर, "मी मारलं नाही, हे घडलं" असं सांगून हत्येचं थेट कारण कधीच स्पष्ट केलं नाही. आता प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत, ज्यात त्यांनी प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचं सांगितलं आहे.