जाहिरात

कर्माचे फळ! परदेशी महिलेकडे सुटे पैसे नव्हते, रिक्षावाला म्हणाला-जा तुम्ही, पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

Viral Video: रिक्षावाल्याने परदेशीसोबत केले असं काही वर्तन की आता हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

कर्माचे फळ! परदेशी महिलेकडे सुटे पैसे नव्हते, रिक्षावाला म्हणाला-जा तुम्ही, पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO
परदेशी महिलेकडे सुटे पैसे नव्हते अन् मग..

Viral Video: दिल्लीमध्ये एक परदेशी पर्यटक महिला आणि रिक्षाचालकामधील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तारा इनग्रम (Tara Ingram) असे परदेशी महिलेचे नाव आहे. ताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिक्षाचालकासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. तारा रिक्षाचालकाकडे प्रवासाची रक्कम देऊन उर्वरित पैसे मागत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावर रिक्षाचालक म्हणतो की, "काही हरकत नाही. तुम्ही जाऊ शकता"

तारा त्याला विचारते,"आर यु श्युअर?" चालक म्हणतो की "चिंता नका करू". यादरम्यान तारा आणि रिक्षाचालकाचे संभाषण एक व्यक्ती ऐकून त्यांच्या मदतीसाठी तेथे थांबते. दोघांमध्ये ही व्यक्ती अनुवादकाची भूमिका निभावताना दिसत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाहा Video:

अनुवादक व्यक्तीने ताऱ्याने सांगितल्याप्रमाणे चालकाकडे आभार व्यक्त केले. चालकाच्या व्यवहाराने प्रभावित होऊन तारा अनुवादकाला म्हणते की, कृपया माझ्याकडून त्यांना धन्यवाद म्हणा. त्यांना मी दोन हजार रुपये देऊ इच्छिते. मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करू इच्छिते, हे देखील सांगा." ताराने पैसे दिल्यानंतर चालक देखील खूप खूश झाला आणि त्यानंही ताराचे आभार मानले.

स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले

(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये युजर्सकडून रिक्षाचालकाच्या निस्वार्थीपणा आणि पर्यटकाप्रति असलेल्या दयाळू वृत्तीचे कौतुक केले जात आहे. एका युजरने लिहिलंय की, "तुम्हाला माहीत नसेल, पण तुम्ही कदाचित त्यांना संपूर्ण दिवसाची कमाई मिळवून दिली असेल. यामुळे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या परिणाम झाला नसेल पण त्यांना खूप फरक पडला असेल."

Viral Trend: हिरव्या रंगाचं नेलपेंट खरंच आयुष्य बदलू शकते? वाचा काय आहे Green Nail Theory

(नक्की वाचा: Viral Trend: हिरव्या रंगाचं नेलपेंट खरंच आयुष्य बदलू शकते? वाचा काय आहे Green Nail Theory)

आणखी एका युजरने म्हटलंय की," तुम्ही खूप अद्भुत आहात. तुमच्यातील दयाळूपणा आणि उदारता तुमच्या आसपासच्या प्रत्येकाला खूप आनंद मिळवून देतो.  तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस, मी खूप भाग्यवान आहे."

तारा आणि रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत  20 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com