
Viral Video: आपल्या देशात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी योग्य संधी मिळू शकली नाही. पण त्यांच्यातील प्रतिभा हीच त्यांची ओळख आहे. अशाच सामान्य लोकांमधील असामान्य कला दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वृद्ध जोडप्याचा सुरेल आवाजासह त्यांच्यातील अफलातून वादन कलाही नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. या वृद्ध जोडप्याने प्रसिद्ध दिवंगत गायक मुकेश आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे सुपरहिट गाणे गायल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. या जोडप्याने त्यांच्या पद्धतीने हार्मोनियम आणि डफलीच्या मदतीने संगीत देऊन गाणं अतिशय सुंदर पद्धतीने गायलंय. त्यांचा हा व्हिडीओ @theprayagtiwari या इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आलाय.
तुम्ही पाहू शकता की व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपे दिसत आहे. सोबत असणारा आणखी एक व्यक्ती या दोघांसह मिळून गाणं गात आहे. हार्मोनियम वाजवत एक वृद्ध व्यक्ती "सावन का महिना" हे सदाबहार गाणं गात आहेत. त्यांच्या शेजारी असलेल्या वृद्ध महिलेनंही डफली कमाल वाजवलीय. संगीत आणि सूर दोन्ही अतिशय सुंदर असल्याने या व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे.
(नक्की वाचा: Prajakta Mali Viral Video: प्राजक्ता माळीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्याने जीव घातला धोक्यात, पाहा व्हिडीओ)
युजर्सचे जिंकलं मन
If you are having a bad day. ♥️ pic.twitter.com/eztQhMji6j
— Prayag (@theprayagtiwari) June 23, 2024
(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)
केवळ एका दिवसात हा व्हिडीओ 1 लाख 68 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. जवळपास सहा हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय. कमेंट करुन नेटकरी त्यांच्या कमेंट्सना खजिना म्हणत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, टॅलेंटची कमतरता नाहीय, पण संधी नाही मिळाली. आणखी एका युजरने म्हटलंय की, यांना योग्य संधी मिळाली पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world