जाहिरात

'आईची काळजी घे...'; कॅन्सरमुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडिलांचा लेकाला शेवटचा संदेश, भावुक करणारा Video

वडील आणि मुलाच्या या शेवटच्या आणि अनमोल क्षणाने सर्वांना दाखवून दिलं की, आई-वडिलांचं प्रेम अमर असतं.

'आईची काळजी घे...'; कॅन्सरमुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडिलांचा लेकाला शेवटचा संदेश, भावुक करणारा Video

Emotional video : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहताना तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. नुकताच असा एक व्हिडिओ समोर आला आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या वडिलांनी जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या लहान लेकराला काही गोष्टी सांगितल्या, जे ऐकताना तुमचंही हृदय पिळवटून निघेल. 

मुलासोबतचे शेवटचे शब्द...

व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलाशी बोलताना दिसत आहेत. वडील अत्यंत प्रेमाने त्याला म्हणतात, रडायचं नाही...तू खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहेस...त्याने मुलाकडून न रडण्याचं वचनही घेतलं...वडिलांच्या या गोष्टी ऐकून इंटरनेटवर प्रत्येकजण भावुक झाला आहे. त्या पित्याच्या हिमतीला सलाम केला जात आहे. 

नक्की वाचा - Success Story : 38 हजारांच्या नोकरीला मारली लाथ; 2 लाखांची गुंतवणूक आता दरमाह एक लाखाची कमाई

पुढे ते आपल्या लेकराला जवळ घेऊन म्हणाले, तुला आईची काळजी घ्यायची आहे. तिचं म्हणणं ऐकायचंय. ते पुढे म्हणाले की, तुला तुझ्या दोन लहान मुलींचीही काळजी घ्यायची आहे आणि त्यांचं संरक्षण करायचं आहे. लहानशा वयात मुलाला एक जबाबदार व्यक्ती बनवण्याचे हे प्रयत्न हृदयाला स्पर्श करणारे आहे. 

जेव्हा कधी आठवण काढशील मी तुझ्या जवळच असेन...

वडील आपल्या मुलाच्या मनातील दु:ख आणि भीती दूर करण्यासाठी एक अत्यंत सुंदर वाक्य म्हणाले.  बाबा कधी दूर निघून गेले तरीही ते कुठे गेले असं विचारू नकोस.. जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल मी तुझ्या जवळपासच असेल. मी नेहमी तुला बघत असेन आणि तुझ्यावर लक्ष देईन. असं म्हणून वडिलांनी मुलाला ही जाणीव करुन दिली की, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत असेल. 

सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया...

हा अत्यंत वेदनादायी आणि भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. लोक कमेंट्समध्ये त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करीत आहेत आणि त्या मुलाला पुढील आयुष्य हिमतीने जगण्यासाठी आशीर्वाद देत आहेत. वडील आणि मुलाच्या या शेवटच्या आणि अनमोल क्षणाने सर्वांना दाखवून दिलं की, आई-वडिलांचं प्रेम अमर असतं.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com