
एक प्रवासी ट्रेनच्या बाथरूममध्ये गेला आणि तब्बल 6 तास बाहेरच आला नाही. बाथरूमचा दरवाजा इतका वेळ बंद पाहून इतर प्रवाशांना शंका आली. त्यांनी आवाज दिला, दरवाजा वाजवला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस, त्यांनी याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे कर्मचारी बाथरूमचा दरवाजा तोडण्यासाठी आले.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रेल्वे कर्मचारी दरवाजा तोडण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. इतका वेळ दरवाजा तोडत असतानाही आत बसलेला प्रवासी स्वतःहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत नाही. काही मिनिटांनी जेव्हा कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाकवला त्यावेळी त्यांनी आतल्या प्रवाशाला गेट उघडण्यास सांगितले.
(नक्की वाचा- Bengaluru Auto Driver: 5 कोटींची 2 घरं, लाखोंचं भाडं, AI स्टार्टअप फाऊंडर… बंगळुरूचा रिक्षावाला Viral)
पाहा Video
त्यानंतर 6 तास बाथरूममध्ये बसलेला प्रवासी दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर आल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला बाथरूमच्या दरवाज्याजवळ उभे करून त्याचा फोटो काढला. रेल्वेने या प्रवाशाला ताकीद सोडून दिले. @i_am_saleem_ नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ही घटना मिश्किलपणे व्हायरल होत असली तरी, छोटा निष्काळजीपणा संपूर्ण डब्यातील प्रवाशांना त्रास देऊ शकते. त्यामुळे बाथरूमचा वापर झाल्यावर दरवाजा उघडा सोडावा आणि जास्त वेळ आत थांबू नये, असे आवाहन रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world