Kalyan Video: धक्कादायक! ठाणे-कल्याण लोकल बनली नशेडिबाजांचा अड्डा; भरदिवसा डब्यात काय घडलं? पाहा हा व्हिडीओ

Kalyan Video: महिला आणि विद्यार्थ्यांनो जपून! ठाणे-कल्याण प्रवासादरम्यानचा भयंकर प्रकार समोर आला; पाहा व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
Read Time: 2 mins
"Kalyan Video: ठाणे-कल्याण लोकलमध्ये गर्दुल्ल्यांचा धुमाकूळ"
NDTV Marathi

Kalyan Video: मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी 'लोकल ट्रेन' सध्या गुन्हेगारी आणि नशेबाजांचा अड्डा बनत चालल्याचं दिसतंय. ठाणे ते कल्याण रेल्वे स्टेशनदरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये काही गर्दुल्ले कोणत्याही भीतीशिवाय डब्यातच नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.

ठाणे-कल्याण लोकलमध्ये नेमकं काय घडलं? | Kalyan Train Video 

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास ठाणे स्थानकातून सुटलेल्या कल्याण दिशेकडील लोकलमध्ये हा प्रकार घडला. धावत्या ट्रेनमध्ये काही तरुण डब्याच्या कोपऱ्यात बसून अमली पदार्थांचे सेवन करत होते. भरदिवसा आणि डब्यात इतर प्रवासी असतानाही या गर्दुल्ल्यांना कायद्याचा किंवा पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. प्रवाशांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केलाय, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मध्य रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा प्रकारांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गर्दुल्ल्यांनी एखाद्या प्रवाशावर हल्ला केला, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल सामान्य प्रवाशांकडून विचारला जातोय. या प्रकारावर प्रवाशांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय.  

(नक्की वाचा: Jalgaon News: मारहाण, अपमान...गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमध्ये भयंकर घडलं, विद्यार्थ्यानं उचललं टोकाचे पाऊल)

रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

प्रत्येक स्थानकावर आणि रेल्वे गाड्यांमध्ये गस्त घालण्याचा दावा रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून केला जातो. भरदिवसा ट्रेनमध्ये नशा सुरू असताना सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्थानक परिसरात वावरणारे गर्दुल्ले आता थेट डब्यात शिरून नशा करू लागल्याने रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश अधोरेखित झाले आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर थेट मृतदेह सापडला)

कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

या घटनेनंतर संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. केवळ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा रेल्वेने कायमस्वरूपी गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारांना चाप लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Advertisement

Thane Kalyan Train मध्ये गर्दुल्ल्यांचा धुमाकूळ, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर । NDTV मराठी